लॉक डाऊन झालंच तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्या?

लॉक डाऊन झालंच तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्या?

नाशिक : कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी आपापली शहरं लॉकडाऊन केली आहेत. भारतातही आणि महाराष्ट्रातही मुंबई, पुणे यांसारखी शहरं लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान राज्यभरात जमावबंदी आदेश लागू केलं असून लवकरच संचारबंदी देखील लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ही पुढील दोन दिवसात निवळली नाही तर लॉक डाऊन शिवाय पर्याय उरणार नाही. ग्रामीण भागातही लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन स्थितीत आपण काय करायला हवे? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लॉकडाऊन असताना कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. म्हणून लॉकडाऊन काळात काय करावे, करु नये? याबाबदल माहिती घेतली पाहिजे.

लॉकडाऊन म्हणजे काय?
लॉक डाऊन म्हणजे शहरातील नागरिकांना विशिष्ट कालावधीसाठी स्थानबद्ध करणे. म्हणजे नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करणे. म्हणजेच असे की, आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबणे. लॉकडाऊन काळात आपल्याला इमारत, परिसर, राज्य, देश अशा ठिकाणी मर्यादेत ठेवले जाऊ शकते.

लॉकडाऊनमध्ये काय काय बंद असत?
लॉकडाउन केलेल्या परिसरात अतिमहत्त्वाच्या सेवा वगळता सर्व गोष्टी बंद ठेवण्यात येतात. वाहतूक आणि दळणवळण पूर्ण बंद असते. फक्त रेशन, किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकल, दवाखाने चालू असतात.

लॉकडाऊनमध्ये काय करावे
आपण ज्या ठिकाणी राहतो, असे सहारा, गाव, जर लॉकडाऊन करण्यात आला तर, आपण घरातच राहावे. तसे करणे बंधनकारक असते. जर अतिशय आवश्यक काम असेल तरच आपण घरातून बाहेर पडा. लॉकडाऊन असताना सर्वसामान्य कामं करण्यास मान्यता नसते. इतर कोणतीही साधने चालू नसल्याने आपल्याला घरातच थांबावे लागते. तसेच खाजगी संस्था , कंपन्या बंद असल्याने येथील कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम करणे आवश्यक असते.

अनावश्यक खरेदी टाळा
लॉकडाऊन स्थिती निर्माण झाली तर नागरिक मोठया प्रमाणावर अन्नधान्य खरेदी करून ठेवतात. अशावेळी आपल्याला लागणार इतकेच साहित्य साठवून ठेवावे. अन्यथा ऍन वाया जाण्याची शक्यता असते, हे लक्षात ठेवावे. आपल्याबरोबर इतरही नागरिक लॉकडाऊन यामध्ये सहभागी होणार असल्याने अन्नधान्याचा तुटवडा निर्मण होऊ नये, यासाठी नागरीकांनी सामाजिक जबादारी ओळखून खरेदी करावी. .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com