त्र्यंबकेश्वर : प्रत्येक आरोग्य सेवक हा देवदूतच; आढावा बैठकीत ना. झिरवाळ यांचे प्रतिपादन
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : प्रत्येक आरोग्य सेवक हा देवदूतच; आढावा बैठकीत ना. झिरवाळ यांचे प्रतिपादन

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : प्रत्येक आरोग्य सेवक हा महत्वाचा दुवा असून अगदी देवदूतासारखे आपले काम आहे. या करोना संकटाच्या काळात आपणही काळजी घ्यायची आहे. तसेच तालुक्यात आतापर्यंत ज्यापद्धतीने समतोल साधला आहे. असाच समतोल यापुढेही राखाल, अशी अपेक्षा विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे कोवीड १९ कोरोना संदर्भात त्र्यंबकेश्वर व ईगतपुरी तालुक्यातील शासकीय अधिकारी वर्गाचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना.झिरवाळ बोलत होते. यावेळी आ.हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे आदी उपस्थित होते.

कोवीड या विषाणूची मुळे जिल्ह्यात मोठया संख्येने रुग्ण बाधीत झाले असून सर्वत्र संचारबंदी व लाँकडाऊन केले असून या लाँकडाऊन कडक अंमलबजावणी होत आहे. परंतु जे अधिकारी व कर्मचारी कामाच्या ठिकाणीहुन अँपडाऊन करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी थांबावे असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे.

यावेळी ना.झिरवाळ यांनी सांगतिले की, करोना हा विषाणू संपविण्यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजचे आहे. त्रिंबक नगर परिषद ने शहरात येणा-या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करावी तसेच तपासणी नाक्यावर मशीन द्वारे तापमान तपासणी करावी. तसेच या संकट समयी रेशनदुकानदारांनी प्रामाणिक पणे वागावे.

तसेच रेशनदुकानात व सर्व किराणा दुकानात दरफलक लावण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले. तसेच यादेखरेख ठेवण्यासाठी अधिका-यांची नियुक्ति करण्याच्या सूचना ही केल्या. तसेच प्रत्येक नागरिकाला धान्य मिळेल याची दक्षता घ्यावी. पुढील महिने अधिक अन्नधान्याची आवश्यकता भासले त्याप्रमाणे नियोजन करावे. यावेळी त्र्यंबकेश्वर व ईगतपुरी येथील विविध अधिकारी वर्गानी आपल्या विभागाचा आढावा सादर केला. तसेच पीपीई किट व मास्क ची मागणी केली.

यावेळी त्र्यंबकेश्वर तहसीलदार दीपक गिरासे, ईगतपुरी तहसीलदार पोलीस उपाधीक्षक भीमशंकर ढोले, त्रिंबक मुख्याधिकारी प्रविण निकम, ईगतपुरी मुख्याधिकारी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोरे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य विभागाचा आढावा सांगितला. ते म्हणाले, तालुक्यात द्वि स्तरीय रचना केली असून तालुक्यात तीन ठिकाणी कोविड सेन्टरची तयारी करण्यात आला आहे. ब्रम्हाव्हॅली येथे १०० बेडचे कोविड सेन्टर, तर हरसूल येथील शासकीय वसतिगृह हरसूल येथें कोविड सेन्टर उभारण्यात येत आहे.

शहरातील स्वामी समर्थला स्वब टेस्ट ची सुविधा करण्यात येणार आहे. तर आरोग्य विभागात पाच विविध मॉनिटर, ऑक्सिजन किट असून पीपी ई किट ची, टेम्प्रेचर टेस्ट गन आणि एका व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
तर उपस्थित असलेल्या पोलिसांनी देखील सुरक्षा किट, मास्क, पीपीई किट ची मागणी यावेळी केली.

Deshdoot
www.deshdoot.com