संशयावरून सिन्नरला तरुणाचा खून
स्थानिक बातम्या

संशयावरून सिन्नरला तरुणाचा खून

Gokul Pawar

सिन्नर : भावाचा खून केल्याच्या संशयावरून सरपंचाच्या पतीसह १० जणांनी तरुणाचा लाठ्याकाठ्या, लोखंडी गज, आणि दगडाच्या साहाय्याने ठेचून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) रोजी दुपारच्या सुमारास घडली. अंबादास विठ्ठल बिन्नर असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात त्या कुटुंबातील महिला व पुरुषांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सरपंच व त्यांच्या पतीसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी कि, काही महिन्यापूर्वी आडवाडी येथील अंबादास विठ्ठल बिन्नर आणि तबाजी बिन्नर हे दोघे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात तबाजी बिन्नर यांचा मृत्यू झाला. दरम्यान टबाजी यांच्या घरच्यांना हा अपघात नसून तो खूनाचा प्रकार असल्याच्या संशय धोंडीराम बिन्नर आणि त्यांच्या कुटुंबियांना होता. त्यानंतर अंबादास गावात आल्याचे लक्षात येताच बिन्नर कुटुंबातील दहा जणांनी अंबादास याची लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत हत्या केल्याचा आरोप मयताच्या भावाने केला आहे.

वरील सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक निरीक्षक माळी याप्रकरणी तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com