येवला : लग्न जमत नसल्याने अंदरसुल येथील युवकाची आत्महत्या
स्थानिक बातम्या

येवला : लग्न जमत नसल्याने अंदरसुल येथील युवकाची आत्महत्या

Gokul Pawar

येेवला : तालुक्यातील अंदरसुल येथे येथील युवकाने लग्न जमत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमोल गणपत जाधव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान अंदरसुल येथे राहणार अमोल हा मोबाईल शॉपीचे दुकान चालवत होता. बऱ्याच ठिकाणचे स्थळ बघितले परंतु लग्न जमत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. अमोल याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात नेण्‍यात आला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असुन पुढील तपास येवला ग्रामीण पोलीस ए.एस.आय. तांदाळकर,पो.कॉ. हेंबाडे हे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com