३६ हजार ४३२ बसेस मधून ४ लाख ३३ हजार ५०९ मजुरांचा प्रवास
स्थानिक बातम्या

३६ हजार ४३२ बसेस मधून ४ लाख ३३ हजार ५०९ मजुरांचा प्रवास

Gokul Pawar

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते. त्या एस.टी बसेस स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. ९ मे पासून आतापर्यंत ३६ हजार ४३२ बसेसद्वारे सुमारे ४ लाख ३३ हजार ५०९ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आतापर्यंत आपल्या लाल परीने मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

यातील काही स्थलांतरीत मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचा ही लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरीत मजुर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे. तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचे ही काम केले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com