ओझरला चाळीस हजाराची पोत लंपास

ओझरला चाळीस हजाराची पोत लंपास

ओझर : अज्ञात चोरट्याने खोलीत प्रवेश करून महिलेने उशीखाली ठेवलेली दोन तोळे वजनाची चाळीस हजार रूपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना ओझर येथे घडली.

दरम्यान अधिक माहिती अशी की, (दि.१२) रोजी पहाटेला ही घटना घडली. प्रांजल अमोल राऊत (रुपेश्वर गल्ली, शिवाजी चौक, ओझर) या महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपी गेली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी डाव साधत उशीखाली ठेवलेली दोन तोळ्याची चाळीस हजार किंमत असलेली सोन्याची पोत लांबवली.

प्रांजल राऊत यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय गायकवाड करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com