कोर्ट आणि वकिल म्हटले की अजुनही हुडहुडी भरते : पालकमंत्री छगन भुजबळ

कोर्ट आणि वकिल म्हटले की अजुनही हुडहुडी भरते : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : कोर्ट आणि वकिल म्हटले की मला अजुनही हुडहुडी भरते, सध्या कोर्टासारखं सरकार फास्ट ट्रॅक काम करते आहे असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ना.छगन भुजबळ यांनी नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या समारोपप्रसंगीं केले.

नाशकात होत असलेल्या दोन दिवशीय राज्यस्तरीय वकील परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. राज्यातील अनेक इमारतींना उभारण्यात तसेच नूतनीकरणात माझा हातभार लागला आहे. सर्वात महत्वाचे दान म्हणून न्यायदाना कडे पाहिले जाते. त्यामुळे निर्दोषास त्रास होता कामा नये. यासाठी वकील महत्वाची भूमिका बजावत असतो. अशावेळी त्यांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

तसेच एखादा गुन्हेगार सुटत असेल तर त्याला कठोर शिक्षाही देण्याचे काम वकील करीत असतात. त्यामुळे होत्याच नव्हतो करतो तोच खरा वकील असे म्हणावे लागेल.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.भुषण गवई, परिवहन मंत्री अनिल परब, न्या.अनुजा प्रभुदेसाई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मकरंद कर्णिक, न्या. संदिप शिंदे, भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता ए. एन. एस. नाडकर्णी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील शेखर नाफडे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com