दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून ऑनलाईन
स्थानिक बातम्या

दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून ऑनलाईन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ण्यात आले असून आज दि. पासून सर्व विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील माध्यमिक शाळांनी ते डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करावेत अशी सूचना करण्यात आली आहे. याच पद्धतीने बारावीच्या होऊ घातलेल्या परीक्षेसाठी देखील याच पद्धतीने प्रवेशपत्र वितरित करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर स्कुल लॉगइन करून शाळांना हे हॉलतिकीट (प्रवेश पत्र ) डाऊनलोड करून घ्यावयाचे आहे. ते प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहे असे मंडळाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.

प्रिंट केलेल्या प्रवेशपत्रावर शाळेचा शिक्का मारून त्यावर मुख्याध्यापकांनी सही करावी. प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या संबंधित विभागीय मंडळात जाऊन शाळांनीच करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मवेळ या संदर्भातील दुरुस्त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवणे आवश्यक असणार आहे. पहिल्यांदा दिलेले प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास त्यांची शाळेने पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (डुप्लिकेट) असा शेरा मारावा आणि मुख्याध्यापकांच्या सहीने ते विद्यार्थ्याला वितरित करावे अशी सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.

प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापकाने शिक्का मारून ही करायची आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी यासंबंधीचे प्रसिद्धिपत्रक काढले असून परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, ाळांनी परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

प्रवेशपत्रावरच परीक्षेचे वेळापत्रक
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक देखील यंदा प्रवेशपत्रावरच छापण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसाठी मोठी सोय झाली आहे. बारावीची लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर दहावीची परीक्षा 3 मार्च पासून सुरु होणार आहे. शिक्षण मंडळाने या परीक्षांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेतले असून आता प्रवेश पत्रांची छपाई करून देणे देखील बंद केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com