PhotoGallery : नाशिककरांचा ‘जनता कर्फ्यू’ला ऊस्फूर्त प्रतिसाद; शहरात शुकशुकाट
स्थानिक बातम्या

PhotoGallery : नाशिककरांचा ‘जनता कर्फ्यू’ला ऊस्फूर्त प्रतिसाद; शहरात शुकशुकाट

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : पंतप्रधान मोदी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला नाशिकरांनी साकळपासूनच उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील गजबजणारी ठिकाणी ओस पडलेली दिसून आली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. दरम्यान आज देशभरात जनता कर्फ्यू लागू आहे. शहरातील नागरिकांनी यास प्रतिसाद देत शहर बंद ठेवले आहे. यामध्ये नाशिकरोड रेल्वे स्टेशन मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहे.

तसेच नाशिकरोड परिसर, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, सिडको, सातपूर आदी महत्वाच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळून जनता कर्फ्यूला नागरिक प्रतिसाद देत आहेत. यामध्ये मेडिकल, तुरळक बसेस, रुग्णालये सुरु आहेत. दरम्यान ही परिस्थिती सकाळच्या सुमारास पाहावयास मिळाली.

Deshdoot
www.deshdoot.com