Thursday, April 25, 2024
HomeनाशिकPhotoGallery : जिल्ह्यात कडकडीत बंद’; जनता कर्फ्यूला ग्रामीण भागातही उस्फुर्त प्रतिसाद

PhotoGallery : जिल्ह्यात कडकडीत बंद’; जनता कर्फ्यूला ग्रामीण भागातही उस्फुर्त प्रतिसाद

नाशिक : कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुकारलेल्या एकदिवशीय जनता कर्फ्यूला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सटाणा , देवळा, सिन्नर, दिंडोरी, सुरगाणा व इतर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांनीही बंद पाळत उस्फुर्त सहभाग घेतला आहे. मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, रिक्षा, डमडम बंद असल्याने सकाळपासूनच उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सकाळी सात वाजल्यापासून गजबजणारी ठिकाणी ओस पडलेली दिसून आली.

- Advertisement -

हतगडला नागरिकांनी कर्फ्युला चांगला प्रतिसाद
सुरगाणा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला हतगड ता.सुरगाणा येथे नागरिकांनी सकाळच्या वेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळच्या वेळेस चांगला प्रतिसाद दिला असून सर्व व्यापारी दुकाने बंद आहेत यामुळे रस्त्यावर आणि गावात शुकशुकाट बघायला मिळत आहे.

देवळा

उमराणे : येथील ग्रामस्थांनी बंदला उस्फुर्त प्रतिसादाला दिला असून सकाळपासूनच आठवडे बाजार तसेच इतर सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दि. ०१ एप्रिल पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद असून शनिवार पासूनच तीन दिवस गावातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना व्हायरस बाबत माहितीचेे फलक गावात ठिकठिकाणी लावण्यात आले आहे, घराघरात माहिती पत्रके वाटली आहेत, त्याप्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

वाजगाव  : ता.देवळा येथे आज रविवार असून प्रधानमंत्री यांच्या जनता कर्फ्यु ला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला सकाळ मोठ्या प्रमाणात गजबजलेल्या वाजगाव चौफुलीवर एकही नागरीक नसून सर्वच दुकाने बंद आहे.

खामखेडा :  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला खामखेडा ता.देवळा येथे नागरिकांनी सकाळच्या वेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळच्या वेळेस चांगला प्रतिसाद दिला असून सर्व व्यापारी दुकाने बंद आहेत यामुळे रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळत आहे.असाच प्रतिसाद रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांनी द्यावा असे आवाहन खामखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

कळवण तालुक्यातील ग्रामिण भागात नागरीकांचा कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

नांदुरी : जनता कर्फ्युत स्वंयस्पुर्तीने सहभागी होऊन कडकडीत बंद पाळत सप्तशृंग गडावर पायी जाणाऱ्या मार्गावर जिल्हाधिकार्याच्या आदेशाने सुचना फलक लावत पायी मार्ग ही बंद करण्यात आला

सिन्नर : सिन्नर बसस्थानक पूर्णतः बंद असून शहरातील मुख्य रस्त्यासह इतर रस्ते ओस पडले आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ गणेश पेठ ही पूर्ण बंद असून शिवाजी चौकात सराफी दुकाने, सिन्नर बाजार समिती, जनावरांचा बाजार देखील बंद आहे. सकाळच्या सुमारास दूध विक्रेते दिसून आले होते.

दिंडोरी
शहरात सकाळी सात वाजेपासूनच पंतप्रधान मोदी यांनी केलेलता आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला.कुठेही कोणीही बळ जबरी केली नसतांना जनतेने रस्त्यावर येणे टाळले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या विरोधातील लढाईत सर्व दिंडोरोकर सहभागी झाले आहे.सर्व पेट्रोलपम्प ,बीअर बार, हॉटेल, शाळा, इतर दुकाने बंद असून गराजेपुरतेच कोणीही बाहेर पडताना दिसत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने आता बर्यापैकी ग्रामीण भागात जागृती झाल्याचे दिसत आहे.

प्रांत संदीप आहेर,तहसीलदार कैलास पवार ,पोलिस निरीक्षक अनिल बोरसे तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे. एकाच ठिकाणी गर्दी जमू नये यासाठी पोलीस वाहन नजर ठेवून आहे.शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. सर्व नागरिकांनी कोरोना या आजाराला हद्दपार करण्यासाठी शासकीय आदेशाचे पालन करावे असे आवाहन नगरसेविका मालती दिलीप जाधव यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी मात्र थोडी अडचण होणार आहे.

मनमाड  : पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. एरवी गजबजलेल्या मनमाड शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. नागरिकांनी घराबाहेर न येणे पसंत केले तर शहरातील व्यापाऱ्यानी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या