नाशिकरोडहुन लखनऊ येथील नागरिकांना सोडण्यासाठी विशेष रेल्वे रवाना

नाशिकरोड : लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या परप्रांतीय नागरीकांसाठी तसेच मजुरांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाडीची सोय केली असून त्यानुसार काल पुन्हा नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशातील लखनऊकडे परप्रांतीय नागरिकांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून अनेक परप्रांतीय नागरिकांना आपल्या घरची ओढ लागल्याने त्यांना घरी जायचे आहे. परंतु रेल्वे बंद असल्याने अनेक नागरिक पायी जात आहे. मात्र आता रेल्वे प्रशासनाने या नागरिकांना जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची ठीक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकवरून सोय केली आहे.

नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून आत्तापर्यंत चार रेल्वेगाड्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश मध्ये रवाना झाल्या आहेत. आज सायंकाळी पाचवी रेल्वे गाडी सुमारे १६३५ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, त्रंबकेश्वर, नाशिक या तालुक्यातील परप्रांतीय नागरिक या रेल्वेगाडीने रवाना झाले. तत्पूर्वी रेल्वे गाडीचे निर्जतुकीकरण करण्यात आले.

तसेच औषधांची फवारणी करण्यात आली लखनऊकडे जाणाऱ्या या प्रवाशांना आणण्यासाठी विशेष खाजगी गाड्यांची सोय करण्यात आली होती. तसेच नाशिक रोड रेल्वे स्थानकात इतर प्रवाशांना प्रवेश दिला जात नव्हता त्याचप्रमाणे पोलीस स्थानक परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सदर प्रवाशांना नाशिक ग्रामीण मधील तहसीलदाराकडे यापूर्वी नोंदणी केलेल्या व उत्तर प्रदेश सरकारची मान्यता मिळालेलया ना या रेल्वे गाडीने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *