कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरीता पोलीसांसाठी खास सॅनिटायझेशन व्हॅन
स्थानिक बातम्या

कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरीता पोलीसांसाठी खास सॅनिटायझेशन व्हॅन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना घरात बसण्याचा सत्ला देणारे पोलीसांना मात्र दिवस-रात्र कर्तव्यावर थांबावे लागत आहे.

नाशिक शहरात प्रत्येक चौकात नाकाबंदी पॉईन्ट लावण्यात आलेली आहे. या नाकाबंदी कर्तव्यादरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी हजारो लोकांच्या संपर्कात येत असुन वाढलेल्या तापमा नात डयुटी करतांना पोलीसांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहे. या अडचणीवर मात करीत पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य करीत आहेत.

दिवसभर कर्तव्य करून व सतत जनतेच्या संपर्कात आल्याने पोलीसांना कोरोना विषाणुची लागण रोखण्यासाठी पोलीसांची वाहने सॅनेटायझेशन करण्याबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश दिले. त्याअनुशंगाने पोलीस ठाणे तसेच शाखेकडील शासकिय वाहने रोज सायनेटाझेशन करण्यात येते आहेत.

तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना पासुन बचाव होणेकरीता खास  सॅनेटायझेशन व्हॅन तयार करण्याबाबतच्या सुचना आयक्तांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उपआुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप चोपडे यांनी पोलीस कर्मशाळेत एक सॅनेटायझेशन व्हॅन तात्काळ तयार करून उपलब्ध करून दिली आहे.

तसेच महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनी यांनी एक अतिरीक्त अद्ययावत  सॅनेटायझेशन व्हॅन अत्यंत कमी वेळेत तयार करून पोलीसदलास दिली आहे. या दोन्ही व्हनमधून पोलीसांवर सौम्य
सोडियम हायपोक्लोराईड व सोप सोल्युशन आणि पाणी याचा फवारा करून  सॅनेटायझेशन करण्यात येत आहे.

असे होईल निर्जंतुकिकरण

या व्हँन शहरातील प्रत्येक नाकाबंदी पॉईन्ट व पोलीस स्टेशन येथील कर्मचा-यांच्या कर्तव्याच्या ठिकणी पाठविण्यात येणार आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या व्हॅन मध्ये जाउन आपला गणवेेश निर्जंतुकिकरण करूनच आपल्या घरी जावे, जेणेकरून अधिकारी व कर्मचारी हे आपल्या स्वत: सोबत परिवाराचा देखील कोरोनाची लागण होण्यापासुन
बचाव करतील.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com