Blog : जगाचा पोशिंदा…. अन्नदाता… बळीराजा

Blog : जगाचा पोशिंदा…. अन्नदाता… बळीराजा

‌आज आपल्या देशावर नव्हे संपुर्ण जगावर कोरोना या संसर्गजंन्य रोगाचे संकट आ वासून उभे आहे. संपुर्ण देशात पुढील २१ दिवस संचारबंदी लागु केलेली आहे. कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या काळात फक्त अत्यावशक सेवाच सुरू असतील. अश्या परिस्थितीत आपले डॉक्टर, पोलीस, सैंनिक व प्रशासन अहोरात्र काम करत आहे.सर्वात महत्वाची अत्यावश्यक सेवा बजवणारा शेतकरी निरंतर आपल्या पोटाची खळगी भरत असतो. त्यामुळे सध्याच्या लोकडाऊनच्या काळातही त्याचा मोठा हातभार लागत आहे. सध्या प्रत्येकास आपला जीव जगविणे महत्वाचे असून त्यासाठी लागणारे अन्नधान्य, भाजीपाल्याची नितांत गरज बळीराजा भागवीत आहे.

खेड्याकडे चला हा महात्मा गांधीजींचा विचार आज लोकांना कळायला लागले आहे. कारण खेड्यातून पुण्या-मुंबईस किंबहूना ईतर मोठ्या शहरात व परदेशात उपजीवीकेसाठी गेलेला माणूस आज सह कुटुंब खेड्याकडे परतत आहे. अशा परिस्थितीत त्याला खेडे चांगले वाटू लागले आहे. मुबलक अन्नधान्य, भाजीपाला, शुद्ध हवा या गोष्टी खेड्यात अनुभवायास मिळतात. या सर्वांच्या दृष्टीने शहरातील माणूस या कोरोनाच्या भीतीने गावाकडे येत आहे. या निमित्ताने का होईना खेड्याचे महत्व आज स्मार्ट सिटी वाल्याना कोरोनामुळे लक्षात येते आहे.

शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला आहे. यासाठी अवघा देश अन्नधान्यसाठी शेतकऱ्यावर अवलंबून असतो. गहु, बाजरी, ज्वारी, मठ, मुग, हरबरा, भात(तांदुळ), नागली, तुर, सोयाबीन, मका किंबहुना इतर शेतातून उत्पादीत होणारा माल व फळे, भाजीपाला, दुध या जीवनावश्यक वस्तू आपल्याला शेतकऱ्याकडून मिळतात. अन्नाची भूक शमवयाची असेल तर त्यासाठी “शेती व शेतकरीच” हवा असतो.

‌ सध्या कोरोनारूपी संकटाच्या वेळी प्रत्येकास चिंता आहे. आपले घरात धांन्याचे पीठ मुबलक आहे का? किराणा मुबलक आहे का? भाजीपाला आहे का? असा प्रशा प्रत्येकास पडला आहे. यासाठी दिवसरात्र एक करणारा शेतकरीच आपल्याला कामाला येत आहे. संपुर्ण देशाची अंन्यधांन्याची, भाजीपाल्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी आज मीतीस सक्षम आहे. सध्या देशातील नागरिकांसाठी आपण डॉक्टर, पोलीस, सैनिक प्रशासन अहोरात्र झटत आहे. त्यासोबत सर्वांची भूक भागविणारा शेतकरीही तितकाच महत्वाचा आहे. या सर्वांचे आभार व कौतुक प्रत्येक भारतीय करीत आहे.

‌ राम मोहन सुरसे, उजणी (वावी) ता.सिन्नर
‌ ९०४९२२७२७३

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com