सिन्नर : भोकणी येथील अपघातात लष्करी जवानाचा मृत्यू

सिन्नर : भोकणी येथील अपघातात लष्करी जवानाचा मृत्यू

सिन्नर : आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा शनिवारी (दि.९) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाल्याची घटना भोकणी येथे घडली.

रितेश रामनाथ सानप (26) असे मृत जवानाचे नाव असून मेरठ येथे ते लष्करात कार्यरत होते.

गेल्या आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर असणारे रितेश सिन्नर- शिर्डी महामार्गावरील देवपूर फाट्याकडून सुरेगाव रस्त्याने घराकडे जात असताना एम एच १५ ईबी ९२७५ ही महिंद्रा झायलो जीप पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी होऊन सानप यांचा मृत्यू झाला. ते स्वतःच जीप चालवत होते.

सिन्नर नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आज (दि.१०) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास सरकारी इतमामात भोकणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह कुटुंबातील मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत सानप यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी व तीन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com