पंचवटी : गणेशवाडीत सोशल डिस्टसिंगचा फज्जा; फुले, भाजी खरेदीसाठी गर्दी

पंचवटी : गणेशवाडीत सोशल डिस्टसिंगचा फज्जा; फुले, भाजी खरेदीसाठी गर्दी

नाशिक । जिल्ह्यासह शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना पंचवटीतील गणेशवाडीत भरणाऱ्या फुल बाजारात नागरिक सुरक्षित सामाजिक अंतर नियमांची सर्रास पायमल्ली करताना दिसून येत आहेत.

गणेशवाडी जवळ असण्याऱ्या हिरावडीत करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर येथून जवळ असणाऱ्या बाजारात दुसऱ्याच दिवशी फुले,भाज्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड दिसली.

इतकेच नव्हे तर अनेकजण चेहऱ्यावर मास्क न लावता रस्त्यात गप्प मारताना दिसत होते. या सर्व धोक्याच्या वागणुकीमुळे पोलिसांनी या भागात अधिक गस्त घालून नागरिकांना सुरक्षित अंतराची शिस्त लावावी अशी मागणी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांनी केली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com