‘होय आम्ही आहोत’, ‘घरात रहा, सुरक्षित राहा’; लघुपटातून जनजागृती
स्थानिक बातम्या

‘होय आम्ही आहोत’, ‘घरात रहा, सुरक्षित राहा’; लघुपटातून जनजागृती

Gokul Pawar

नाशिक : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युवा चित्रकार विनोद सोनवणे यांनी सुुरक्षित शारिरीक अंतराचे नियम पाळून दिग्दर्शित केलेला ‘होय आम्ही आहोत’ लघुपट यूट्यूबर प्रदर्शित होत आहे. ‘घरात रहा, सुरक्षित राहा’हा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

कोव्हिड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर समाजातील तरूण कलावंत अस्वस्थ होऊन छत्रपती शिवाजी महारांजाना ‘राजे पुन्हा जन्माला या’ अशी आर्त साद घालतो. महाराज त्याला प्रसन्न होतात आणि सांगतात, मला जन्माला पुन्हा यायची गरज नाही. मी नागरिकांनी पाळलेल्या सिग्नलच्या शिस्तीत, खाकी वर्दीतल्या पोलिसांमध्ये, जीवदान देणार्‍या डॉक्टरच्या हातात. सफाई सेवकांच्या हृदयात.

कष्टकर्‍यांच्या घामात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या प्रत्येक कायद्याच्या कलमात, दुवामध्ये, प्रार्थनेत, आरतीमधील निरांजनीत तेवणार्‍या ज्योतीत, गरीबाला मदत म्हणून दिलेल्या भाकरीत, माणूसकीत, मास्क लावलेल्या सुरक्षित माणसात, निसर्गात, चराचरात माझाच वास आहे. महाराजांना लघुपटात प्रगट करुन ‘तूच हो तूझा रक्षक‘ असा संदेश यामध्ये देण्यात आला.

सोनवणे यांनी लॉकडाऊनचे नियम पाळत मोबाईलद्वारे सोसायटीमध्येच लघुपटाचे चित्रीकरण केले. दिग्दर्शकासह महेश उपासणी यांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. संकलन सुरेश मुंजे यांचे तर कल्याणी उपासणी, राज सोनवणे यांनी छायांकन केले.

Deshdoot
www.deshdoot.com