येवला : मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
स्थानिक बातम्या

येवला : मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

Gokul Pawar

Gokul Pawar

येवला : मांडूळ जातीचे साप पकडून ठेवणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे.

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील सत्यगाव येथे राहणारा सोमनाथ रामनाथ पवार (२३) रा सत्यगाव ता येवला व त्याचा एक साथीदार (नाव समजू शकले नाही ) यांनी मांडूळ जातीचा साप पकडलेला असून त्याच्या राहत्या घरात दडवून ठेवल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे त्याच्या घरी धाड टाकली असता घरासमोरील एका रांजनात मांडूळ जातीचा सर्प मिळून आला.

यावेळी सर्प व दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या आरोपींना ०२ जून रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ०६ जून २०२० पर्यंत फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे.

उपवनसंरक्षक नाशिक तुषार चव्हाण सुनील नेवसे सहा वनसंरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी येवला संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली एम बी पवार वनपाल येवला, प्रसाद पाटील एन एम बिन्नर विलास देशमुख यांनी या कारवाईत भाग घेतला याप्रकरणी वनविभाग पुढील तपास करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com