नाशिककरांनो! येत्या बुधवारपासून स्मार्ट पार्किंग ‘गो लाईव्ह’ होणार; जाणून घ्या सविस्तर
स्थानिक बातम्या

नाशिककरांनो! येत्या बुधवारपासून स्मार्ट पार्किंग ‘गो लाईव्ह’ होणार; जाणून घ्या सविस्तर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली १५ ठिकाणांची स्मार्ट पार्किंग ४ मार्च २०२० पासून प्रायोगीक गो लाईव्ह होणार आहे. स्मार्ट पार्किंगचे शुल्क दुचाकी गाडी साठी ५ रुपये प्रतितास तर चार चाकी गाडी साठी १० रुपये प्रतितास असे आकारण्यात येणार आहे.

शहरामध्ये पार्किंगची गरज लक्षात घेता नाशिक महानगर पालिका व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत स्मार्ट पार्किंग संकल्पना समोर आली. त्यासाठी शहरातील ३३ ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला आणि २८ ठिकाणी ऑन स्ट्रीट आणि ५ ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था राबवण्यात येत आहे.

स्मार्ट पार्किंगचा आराखडा बनवताना वर्दळीच्या ठिकाणी, पीक अवर्समध्ये होणारी गर्दी आणि ना फेरिवाला क्षेत्र या सर्वांचा अभ्यास करूनच आराखडा बनवण्यात आला. सध्या शहरात १५ ठिकाणी स्मार्ट पार्किंग राबविली जात आहे. त्यात १३ ठिकाणी ऑन स्ट्रीट व २ ठिकाणी ऑफ स्ट्रीट स्मार्ट पार्किंग असणार आहे.

काय आहे गो लाईव्ह?
सध्या १५ ठिकाणी प्रायोगीक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग व्यवस्था राबवण्यात येत आहे. ४ मार्च २०२० पासून प्रायोगीक गो लाईव्ह होणार आहे. स्मार्ट पार्किंग जेथे जेथे आहे तेथे तेथे चार चाकी वाहना करिता सेंसर्स लावण्यात आले आहेत. म्हणजे काय, तर कोणतीही चार चाकी गाडी स्मार्ट पार्किंगमध्ये उभी केली की ती सेंसर डीटेक्ट करेन. याद्वारे स्मार्ट पार्किंगची जी कंट्रोल रूम आहे तेथे कोणत्या वेळेला किती वाहनं स्मार्ट पार्किंगमध्ये उभी आहेत याचा डाटा तयार होईल. हा डाटा भविष्यात नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांना घरबसल्या पार्किंगसाठी जागेची निवड करता येणार आहे.

“पार्किंग ॲट फिंगरटीप”
“पार्किंग ॲट फिंगरटीप” म्हणजेच घरबसल्या पार्किंगसाठी जागेची निवड करता येणार आहे. स्मार्ट पार्किंग म्हणजेच एखाद्या वेळी आपण घरातून निघाल्यानंतर निश्चिंतस्थळी जाऊन वाहन पार्क करणे आवश्यक असते. अशावेळी पार्किंगसाठी जागा शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरातच तुम्हाला मोबाईलवर समजलं आणि पार्किंग बूक करता आली तर यासाठी गुगल प्ले स्टोअरला किंवा आयओएस वरून “नाशिक स्मार्ट पार्किंग” हे अँप डाऊनलोड करून ते ऑपरेट करता येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com