Video : संत समागम सोहळा | चौदा देशातील साठ डॉक्टरांचा ‘निरंकारी’ सेवाभाव
स्थानिक बातम्या

Video : संत समागम सोहळा | चौदा देशातील साठ डॉक्टरांचा ‘निरंकारी’ सेवाभाव

Gokul Pawar

नाशिक | कुंदन राजपूत : सेवा एक समर्पण आहे. समर्पण लाकडासारखं असतं. प्रवाहात तरणारं अन् उपेक्षितांना तारणारं. सेवेला भाषिक, धार्मिक आणि प्रांतिक सिमांचें बंधन नसते, हा संदेश बोलण्यातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून सातासमुद्रापारहून आलेले विदेशी डॉक्टर देत आहे. निरंकारी संत समागम सोहळ्यात 14 देशातील 60 कॅरयोप्रॅट्रिक तज्ज्ञ डॉक्टर भाविकांवर मोफत उपचार करुन मानवसेवेचा वस्तुपाठ घालून देत आहेत. भारतीयांइतकेच तेही अभिमामाने ‘आय लव्ह इंडियां’ म्हणत सेवेचा आनंद घेत आहे.

संत निरंकारी मिशनतर्फे बोरगड येथे 53 वे समागम आयोजीत करण्यात आले आहे. देशातील सर्वच राज्यातून तब्बल दोन लाख भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. जाती, धर्माच्या भिंती पाडून प्रेमाचा संदेश येथे दिला जात आहे. या ठिकाणी अमेरिक, जर्मनी, ब्राझील, कॅनडा, पोर्तुगाल,नेदरलॅण्ड, फ्रांस यांसह 14 देशातून कॅरयोप्रॅट्रिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित आहे. समागममध्ये सहभागी होण्यासाठी व्यावसायिक दृष्टीकोन बाजूला सारत मानवतेच्या सेवेसाठी या ठिकाणी ते उपस्थित आहे. समागममध्ये आलेल्या अनेक भाविकांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे. या भाविकांवर ही डॉक्टरांची टीम मोफत उपचार करते.

भारतात जवळपास शंभरपैकी ऐंशी लोकांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे. त्यावरील उपचार हे अत्यंत महागडे आहे. सर्वसामान्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कॅनडाचे डॉ.जिमी नंदा हे इंडियन असोसिएशन ऑफ कॅरयोप्रक्ट्रिक संघटनेचे अध्यक्ष आहे. त्यांचे आजी व आजोबा या मिशनशी जोडलेले होते. ते मागील 14 वर्षांपासून समागममध्ये मोफत उपचार करुन सेवा देत आहे. समाधानाचे मोल हे पैशात मोजता येत नाही, असे ते सांगतात. आतापर्यंत त्यांनी हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले आहे.

तर, अमेरिकेची डॅनियल हीचे कॅलिफोर्नियामध्ये स्वत:चे हॉस्पिटल आहे. समागममध्ये येण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. या ठिकाणी काम करण्याचा अनुभव सुंदर आहे. पुढील वेळी हॉस्पिटलमधील टीमला देखील सोबत घेऊन येईल, अशी ती सांगते. जिमी व डॅनियल सारखे विविध देशातून आलेले डॉक्टर निरंकारी वृत्तीने सेवाभाव जपत मानवतेचा संदेश देत आहे.

दिल्लीत चार डॉक्टरांची टीम
दिल्लीतील निरंकार कॉलनी असून या ठिकाणी मणक्याच्या विकारांवर उपचारासाठी अमेरिकतील कॅरयोप्रक्ट्रिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे. त्या ठिकाणी देखील हे 60 डॉक्टर मोफत सेवा देतात.

डॉक्टरांचा व्हॉटस्अप गु्रप
डॉ.जिमी नंदा यांनी प्रथम समागममध्ये सहभागी होऊन सेवा दिली. त्यांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करुन इतर देशातील डॉक्टांना देखील या सेवेत सहभागी करुन घेतले. मिशनतर्फे ज्या ठिकाणी समागम असेल त्याची माहिती गु्रपवर दिली जाते. समागममध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर विशेष सुट्टी घेऊन भारतात येतात.

Deshdoot
www.deshdoot.com