मालेगाव : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; तरुणाला कोठडी
स्थानिक बातम्या

मालेगाव : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; तरुणाला कोठडी

Gokul Pawar

Gokul Pawar

मालेगाव । सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेस शेतात नेवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी बावीस वर्षीय तरुणास वडनेर खा. पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील दुंधे येथे शिवारात काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राकेश ऊर्फ बापू देवराम रौंदळ असे त्या नराधम तरुणाचे नाव आहे. आज त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
या बालिकेला राकेशने गोडीगुलाबीने शिवारातील शेतात नेले. तेथे त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

दरम्यान, हा प्रकार राकेशच्या भावाला लक्षात येताच त्याने पीडित बालिकेच्या आई-वडिलांना माहिती दिली. अत्याचारामुळे रडत असलेल्या बालिकेस तातडीने मालेगावी सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सपोनि रामेश्वर मोताळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यासंदर्भात तक्रार नोंदवून रात्री उशिरा पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राकेश रौंदळ यास पोलिसांनी अटक केली. लैंगिक अत्याचार व पोस्को कायद्यान्वये त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com