नवीन नाशिक : इन्कमटॅक्स कॉलनीच्या जागेतील शेडला शॉकसर्किटने आग

नवीन नाशिक : इन्कमटॅक्स कॉलनीच्या जागेतील शेडला शॉकसर्किटने आग

नवीन नाशिक । दुर्गानगर येथील इन्कमटॅक्स कॉलनी सोसायटीच्या जागेतील शेडला शॉकसर्किटने आग लागल्याने अडगळीच्या सामानाचे नुकसान झाले. सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज (दि.2) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास नवीन नाशिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशेजारील इन्कमटॅक्स कॉलनीच्या ताब्यातील जागेत असलेल्या शेडला अचानक आग लागली. यावेळी शेडमध्ये व बाहेर असलेले संपूर्ण लाकडाचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच नवीन नाशिक अग्निशामक पथक घटनास्थळी आले. यावेळी बघ्यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्याचा आग विझवताना अग्निशामकच्या कर्मचार्‍यांना त्रास झाला.

ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन बंब वापरावे लागले. गेल्या 20 दिवसांपूर्वी याच शेडला मध्यरात्री आग लागली होती. त्यावेळी देखील अग्निशामक दलाच्या पथकाने येऊन तात्काळ आग विझवली होती. सदर शेडमध्ये अडगळीचे सामान मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले आहे. याची सोसायटीने तात्काळ विल्हेवाट लावल्यास पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे जाणकारांनी व्यक्त केले.

यावेळी अग्निशामक दलाचे शिवाजी मतवाड, अविनाश सोनवणे, मोईनुद्दीन शेख, संजय गाडेकर, काका पवार, एस.डी.घुगे, आय.आय.काजी आदींनी सुमारे दीड तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com