Friday, April 26, 2024
Homeनाशिकशिवराज्याभिषेक दिन : रयतेने गडकोटांचे जतन करणे हाच शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक दिन : रयतेने गडकोटांचे जतन करणे हाच शिवराज्याभिषेक

नाशिक : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी लाखों शिवभक्तांची मांदियाळी असणाऱ्या रायगडावर यंदा मोजक्या मावळ्यांसह शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे.

दरम्यान येथील दुर्ग संवर्धनचे राम खुर्दळ यांनी गड कोटांचे जतन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन दुर्ग प्रेमींना केले आहे. तसेच शिवराज्याभिषेक घरीच राहून विविध उपक्रमांनी साजरा करावा. शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. यामुळे शिवरायांना अभिप्रेत असा शिवराज्याभिषेक साजरा होईल.

- Advertisement -

दरवर्षी रायगडावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. राज्यभरातून चाळीस ते पन्नास हजार शिवभक्त शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला उपस्थित राहतात. पण यावेळी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रायगडावर हा दिवस साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ केला जात आहे.

दुर्गराज रायगड असंख्य शिवभक्तांची दुर्गपंढरीच आहे. जशी पांडुरंगाच्या पंढरीला लाखो वारकरी आषाढ वारीला जातात. तसेच असंख्य शिवभक्त छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकदिनी दुर्गराज रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या अभिवादन करतात. रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात होत असतो. यानिमित्ताने रायगडावर कोरोना साथीमूळ जाता येत नसल्याने लाखो शिवभक्तांची वर्षानुवर्षे रायगडावर जमणारी मांदियाळी यंदा दिसणार नाही.मात्र परंपरेनुसार छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले रायगडावर ही परंपरा साजरी करणार आहे.

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात ३५० गडकिल्ले दिमाखाने उभे आहेत. पण आजच्या काळात या गड किल्ल्यांची दैना झाली आहे. हेच दुर्ग जे शिवशंभुराज्यानी प्राणपणाने लढले, तेच दुर्ग आजच्या काळात अखेरची घटका मोजत आहे. फार बोटावर मोजता येतील इतक्या दुर्गसंवर्धन संस्था, मोहिमा गडांच्या अस्तित्वासाठी अविरत राबत आहे.

त्यासाठी लाखों मावळ्यांनी ‘गडकिल्ले जतन संवर्धनाचा’ संकल्प करून दुर्गसंवर्धनाची शपथ घेऊन शिवराज्याभिषेक साजरा करावा असे आवाहन शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या