इगतपुरीतही शिवभोजन थाळीचा शुभारंभ; गोरगरिबांना १०० थाळींचे मोफत वाटप
स्थानिक बातम्या

इगतपुरीतही शिवभोजन थाळीचा शुभारंभ; गोरगरिबांना १०० थाळींचे मोफत वाटप

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी : शहरातही शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला असून पहिल्याच दिवशी शंभर गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले.

दरम्यान इगतपुरी शहरातही शिवभोजन थाळी सुरू झाली आहे.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष वसीम सय्यद यांचे नावे मंजूर होऊन येथिल साईबाबा स्वय: सहाय्यता बचत गटा मार्फत शहरातील पटेल चौक येथे इगतपुरीच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार अर्चना भाकड यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.

सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात संचारबंदी लॉकडाऊन करण्यात आल्याने राज्यातील गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणुन महाआघाडी सरकारने ५ रुपयात शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली.

याच पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीच्या कॉंग्रेस पक्षाचे इगतपुरी-त्रंबकेश्वर मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या आमदार कोठ्यातून मंजूर करणे कामी आमदार खोसकर यांनी पालकमंत्री तथा अन्न व नागरी मंत्री श्री. छगनराव जी भुजबळ यांना प्रस्ताव दिला असता त्यांनी तत्काळ एका दिवसात मान्यता दिली.

या वेळी १०० थाळींचे गोरगरिबांना मोफत वाटप करण्यात आले.दरम्यान या कार्यक्रमात संचारबंदी कायद्याचे कडेकोट पालन करण्यात आले या कार्यक्रमास साईबाबा स्वय: सहाय्यता बचतगटाच्या अध्यक्षा अपर्णा पाटील, माधुरी पाटील, ज्ञानेश्वर पासलकर,, महेश शिरोळे, मिलिंद हिरे उपस्थित होते

Deshdoot
www.deshdoot.com