शरद पवार शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर
स्थानिक बातम्या

शरद पवार शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

Gokul Pawar

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शरद पवार हे येत्या शुक्रवारी (दि. १७) नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ‘विंटेज २०२०’चे उद्घाटन केले जाणार आहे.

भारतीय वाईन द्राक्ष क्रशिंग सिझनचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत विंचूर वाईन पार्क येथे केला जाणार आहे. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, जगदीश होळकर यांच्यासह वाईन उत्पादक उपस्थित राहणार आहे.

शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांनतर पवार नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com