दृष्टीहीनांच्या आयुष्यात रंग भरणार ‘शालिमार पेन्ट्स’
स्थानिक बातम्या

दृष्टीहीनांच्या आयुष्यात रंग भरणार ‘शालिमार पेन्ट्स’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : शालिमार पेंट्स च्या माध्यमातून दृष्टीहीनांच्या जीवनात रंग भरण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘कलर अ लाइफ’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत कंपनीने नेत्र रुग्णालयातील खोल्यांना व्हायब्रंट रंगांनी रंगवले असून यामुळे मुलांनी आतापर्यंत केवळ कल्पनेत पाहिलेले रंग त्यांना प्रत्यक्षात अनुभवता येणार आहेत.

दरम्यान या डिजिटल अभियानाद्वारे अंध मुलांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा तसेच या मुलांना मदत करण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन करीत अंध:कार ते रंग यातील दरी सांधण्याचा शालिमार पेंट्सने प्रयत्न केला आहे.

शालिमार पेंट्सच्या मिनल श्रीवास्तव म्हणाल्या, आपल्या देशात असंख्य मुले दृष्टीबाधित आहेत. त्यांच्यावर पूर्ण उपचार होईपर्यंत रंगांशी त्यांचा अजिबातच संबंध येत नाही. या मुलांना दृष्टी नसली तरी प्रत्येक मुलाला एक वेगळ्या प्रकारची एक देणगी मिळालेली असते.

दुर्दैवाने या क्षेत्रात पैशांचा अभाव नाही, पण कॉर्नियाचा तुटवडा आहे. या अभियानाद्वारे आम्ही समाजातील तरुण मुलांपर्यंत पोहोचणार असून हे तरुण नेत्रदान करण्याकरिता समाजातील लोकांचे मनपरिवर्तन करु शकतील.”

Deshdoot
www.deshdoot.com