अंबड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा
स्थानिक बातम्या

अंबड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। फेसबुक या सोशल साईडच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरूणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

अक्षय हिवाळे (रा. कामटवाडे, रा. अंबड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार परिसरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी संशयीताने फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्याने संशयीताने प्रेमाच्या आणाभाका देत मुलीस मित्र तुषार याच्या रूमवर नेवून वेळोेवेळी अत्याचार केले.

हा प्रकार सप्टेबर 2019 पासून सुरू राहिल्याने लैंगिक पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com