Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : नांदूरशिंगोटे येथे सात दुचाकी जप्त; तिघांवर कारवाई

सिन्नर : नांदूरशिंगोटे येथे सात दुचाकी जप्त; तिघांवर कारवाई

नांदूरशिंगोटे : कोरोना संसर्गजन्य रोगाची साथ सुरू असताना तोंडाला मास्क अगर रुमाल न लावता जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे तिघांवर कारवाई करण्यात आली. तसेच सात दुचाकी पोलिसांनी जमा केल्या आहेत.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात लाँकडाऊन सुरू आहे. यासाठी संचारबंदी लावण्यात आली असून या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर वावी पोलिसांकडून 188 कलमानुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्या पाश्वभूमीवर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या कडेला तिघेजण दुचाकीवर उभे असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

तसेच नाशिक-पुणे महामार्ग, निमोण व चास नाका या भागात असणाऱ्या रस्त्यावरील सात दुचाकीस्वार मोटारसायकल सोडून पळून गेल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावरील अज्ञात चालकांवर पोलीस शिपाई उमेश खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस
निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण आंंढागळे करत आहे. जप्त केलेली वाहने नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्राच्या आवारात ठेवण्यात आली आहे. या कारवाईत जप्त केलेली वाहने पोलीसांच्या ताब्यात राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या