देवळा विद्यानिकेतन शाळेसाठी सात सदस्यीय समिती गठीत

देवळा विद्यानिकेतन शाळेसाठी सात सदस्यीय समिती गठीत

नाशिक । जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातंर्गत असलेल्या देवळा विद्यानिकेतन शाळा बंद करण्यावरून सभागृहात सदस्यांमध्ये गदारोळ झाल्यानंतर, शाळेची गुणवत्ता वाविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.याचाच भाग म्हणून बनसोड यांनी तात्काळ शाळा पाहणीसाठी सात सदस्यीय समिती गठीत केली आहे.शिक्षण समिती सभापती अध्यक्ष असलेल्या या समितीकडून शाळेची पाहणी करण्यात येणार आहे.त्यानंतर आवश्यक ते बदल शाळेत केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सोमवारी(दि.16) झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत देवळा विद्यानिकेतन शाळेवर जोरदार चर्चा झाली.ही शाळा गुंडांची झाल्याचे वक्तव्य सदस्य उदय जाधव यांनी केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला.यानंतर यतिंद्र पगार,डॉ.आत्माराम कुंभार्डे, नूतन आहेर, यतिन कदम आदी सदस्यांनी शाळेच्या तक्रारींचा पाढा वाचला.शाळेचा दर्जा घसरला असून शाळा म्हणजे पांढरा हत्ती असून तो जिल्हा परिषदेने का पोसायचा? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले होते.

त्यानंतर झालेल्या चर्चेत ही शाळा बंद करण्याचा निर्णयच सभागृहाने घेतला.मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी शाळेची बाजू लावून घेत शाळा बंद करू नका,असे सांगितले. शाळेच्या तक्रारी असतील, गुणवत्ता दर्जा घसरला असेल मात्र,आपण तो सर्व मिळून सुधारण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. बनसोड यांनी शाळेच्या तक्रारींची शहनिशा करण्यासाठी समिती गठीत करू, समितीकडून अहवाल घेतला जाईल.शाळा सुधारण्याची ग्वाही मी देते तीन महिन्याचा अवधी द्या,असे बनसोड यांनी सभागृहात सांगितले होते.

यानुसार बनसोड यांनी मंगळवारी (दि.17) तात्काळ शाळेची पाहणी करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठन केले असून शिक्षण समिती सभापती अध्यक्ष असतील.याशिवाय उप मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव म्हणून काम पाहतील.समिती शाळेच्या झालेल्या तक्रारींची शहनिशा करून अहवाल सादर करणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com