सप्तशृंगी गडावर येत्या दोन महिन्यात सुसज्ज बसस्थानक उभारणार : परिवहन मंत्री अनिल परब

सप्तशृंगी गडावर येत्या दोन महिन्यात सुसज्ज बसस्थानक उभारणार : परिवहन मंत्री अनिल परब

सप्तशृंगी गड : भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वाणी येथील सप्तशृंगीवर गडावर लवकरच सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

दरम्यान शनिवारी (दि.१५) पहाटे सुमारास राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सप्तशृंगीचे दर्शन घेतले. यावेळी सप्तशुंगगडावर येणाऱ्या भाविकांसाठी बसस्थानक नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच सप्तशुंगगडावरील ग्रामस्थांनी शिवालय तलावाकडील जागेत नवीन बसस्थानक उभारून द्यावे यासाठी मंत्री परब यांना निवेदन देखील दिले.

यावर उत्तर देताना परिवहन मंत्री म्हणाले कि, सप्तशृंगी गडावर जिह्यासारखे सुसज्ज बसस्थानकाचे काम येत्या दोन महिन्यात मार्गी लावणार आहोत. यावेळी ग्रामस्थ प्रकाश कडवे , प्रदीप कदम, राजेन्द्र वाघ,रमेश पवार, धनेश गायकवाड, महेश पाटील (शहरप्रमुख शिवसेना) माजी उपसरपंच संदिप बेनके, राजेश गवळी देवी संस्थानचे व्यवस्थापक सुर्दशन दहातोडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांच्यसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

सप्तशृंगी गडावर नाशिक व अनेक ठिकाणी बसेस सातत्याने ये जात करत असता तिथे बसेस ला किंवा भाविकांना उभे राहण्यासाठी जागाही नाही ,नवीन बस स्थानक शिवालय तलाव या ठिकाणी उभारल्यास प्रवाश्याची गैरसोय थांबेल अशी मागणी सप्तशृंगी ग्रामस्थ कडून होत आहे आणी २ महिन्यातच नवीन बस्थानक होईल असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी ग्रामस्थांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com