कविता दिनी काव्य हरपले; नाशिकचे जेष्ठ कवी किशोर पाठक यांचे निधन

नाशिक : ज्येष्ठ कवी सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून प्रकृती अस्वाथ्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी २:२० त्यानी अखेरचा श्वास घेतला.

नाशकातील जनस्थान ग्रुप चे ते पहिले आयकॉन होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्रात दुःखाचे सावट पसरले आहे. शहरातील अशोक मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किशोर पाठक हे एक मराठी लेखक व कवी आहेत. संतसाहित्याचे अभ्यासक प्रा.डाॅ. यशवंत पाठक यांचे ते कनिष्ठ बंधू होते.

कवी किशोर पाठक यांची साहित्यसंपदा

अंत:स्वर (नाटक)
असा कसा तसा (बालसाहित्य)
काळा तुकतुकीत उजेड (कथासंग्रह)
चुळूक बुळूक (बालकविता)
झुळ झुळ झरा (बालकविता)
जीर्ण रेषांच्या खाली (कथासंग्रह)
बेचकीत जन्मतो जीव (काव्यसंग्रह)
अंत:स्वर (नाटक)
मिटल्या पानांची झाडं (कथासंग्रह)
शुभ्र कोवळे आभाळ गाणे (काव्यसंग्रह)
सम्भवा (काव्यसंग्रह)
स्वप्न करू साकार (कविता)


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *