Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआणखी एक शब्द पूर्ती; कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

आणखी एक शब्द पूर्ती; कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पंधरा जिल्ह्यांमधील तब्बल २ लाख शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात आले आहे. त्यानंतर आता दुसरी यादी जाहीर करण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या यादीत पंधरा जिल्ह्यांमधील तब्बल २ लाख शेतकऱ्यांचा समावेश असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

दुसऱ्या यादीत अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख 52 हजार 483 जणांची तर वर्धातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारीला कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या