घोटी येथील दारणा नदीपात्रात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

घोटी येथील दारणा नदीपात्रात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Gokul Pawar

घोटी : येथील दारणा नदीच्या पात्रात घोटी येथील एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कु. शंकर उर्फ गोकुळ रतन आव्हाड असे या मुलाचे नाव आहे.

दरम्यान शंकर हा मित्रांसोबत अंघोळीसाठी घोटी काळूस्ते पुलाजवळ दारणा नदीवर गेले होते. परंतु शंकर यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना समजताच असंख्य युवक कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्यात उडी घेतली. यानंतर दारणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने या युवकाला तासाभरानंतर बाहेर काढण्यात आले.

घोटी ग्रामीण रुग्णालयात तपासणीनंतर या युवकास मृत म्हणून घोषित करण्यात आले. घटना समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बिपीन जगताप, मोरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com