पेठ : विद्यार्थिनीने एक तोळ्याची अंगठी केली परत; मुख्याध्यापकांकडून कौतुक
स्थानिक बातम्या

पेठ : विद्यार्थिनीने एक तोळ्याची अंगठी केली परत; मुख्याध्यापकांकडून कौतुक

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : पेठ तालुक्यातील धानपाडा येथील शिक्षकाची सुमारे ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी मैदानावर खेळत असतांना पडली होती. ही अंगठी शाळेतीलच विद्यार्थिनी राजश्रीला सापडली. तिने प्रामाणिपणा दाखवित ही अंगठी  शिक्षकास परत केली. राजश्रीने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान धानपाडा ता. पेठ येथील आदिवासी कुटुंबातील राजश्री दरोडे हि येथील बोरवठ शासकीय आश्रमशाळेत सातवीत शिकते आहे. शनिवारी पिटी चा तास असल्याने शिक्षक अमोल कांबळी मुलांना घेऊन क्रीडांगणावर खेळ घेत असताना त्यांच्या बोटातील एक तोळ्याची म्हणजेच तब्बल ४० हजार रुपयांची अगदी मैदानावर हरवली.

शाळा सुटल्यानंतर राजश्री घरी जात असताना मैदानावर तिला ही अंगठी सापडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले कि दुपारच्या सुमारास सरांची अंगठी हरवल्याची माहिती मिळाली होती. लागलीच तिने कार्यालय गाठत शिक्षकास अंगठी परत केली. संबंधित शिक्षकांना अंगठी परत करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. राजश्रीच्या प्रामाणिकपणाबद्दल मुख्याध्यापक मनोहर मोरे यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com