सातपूरचा भाजीबाजार त्र्यंबकेश्वर रस्त्यावर
स्थानिक बातम्या

सातपूरचा भाजीबाजार त्र्यंबकेश्वर रस्त्यावर

Gokul Pawar

सातपूर : जिल्ह्यात करूना रुग्ण सापडल्यानंतर सर्वोच्च यंत्रणा नेटाने कामाला लागल्या. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सूचना देऊनही भाजी व्यवसायिक सुरक्षित अंतर ठेवत नसल्याने अखेर पोलिस व मनपा प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत सातपूर येथील छत्रपती शिवाजी मंडळीचे दोन्ही दारांना सील ठोकण्यात आले.

संसर्गातून पसरणारा कोरोना व्हायरसला थांबवायचे असेल तर प्रत्येकाने सुरक्षित अंतर पाळले पाहिजे. अशा सूचना सातत्याने प्रशासन भाजी व्यवसायिकांना देत आले.  किराणा व भाजी दुकानांच्या समोर सुरक्षित अंतराची चौकोनही आखण्यात आली आहे, मात्र या बाबींना गांभीर्याने घेतले गेले नाही. नाईलाजाने पोलीस प्रशासन व मनपा ने कारवाईचा बडगा उगारत मंडळाच्या दोन्ही घटना दोन्ही प्रवेशद्वारांना सील ठोकले.

भाजीबाजार बंद केल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत त्रंबकरोडवरील प्रांगणात सुरक्षित अंतरावरील चौकोण आखून त्याठिकाणी व्यवसायिकांना बसण्याची मुभा देण्यात आली.  जेणेकरून व्यवसायिक ग्राहक यांच्यात योग्य अंतर राहील तसे नियोजन करण्यात आले होते.

मात्र काल सकाळपासून भाजी विक्रेत्यांनी त्रंबक रोड वरील दुकानासमोर आपले बस्तान मांडताना सूरक्षीततेचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसुन येत आहे.

अखेर मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलत अतिक्रमण विभागाच्या वाहनाचे याठिकाणी तळ ठोकला. त्यामुळे सायंकाळ पर्यंत या व्यवसायिकांनी आपले व्यवसाय थांबले होते. प्रशासनाने त्रंबकरोडवर सुयोग्य पद्धतीने चौकोन आखून दिले असले तरी भाजीविक्रेते मात्र सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत बेजबाबदारीने वागत असल्याचे चित्र आहे.

मोफत भाजीपाला वाटप
कोरोना मुळे भाजी मार्केट मध्ये गर्दी होऊ नये म्हणून चुंचाळे गांवातील नागरीकांना मोफत भाजीपाला निवृत्ती इंगोले यांच्या पुढाकाराने वाटप करुन समाजापुढे समाजसेवेचा नवा वस्तूपाठ ठेवण्यात आला. भाजीपाल्या साठी होत असलेली गर्दी करोना आजाराला निमंत्रण ठरु शकते हे सुत्र लक्षात घेत निवृत्ती इंगोले यांच्यासह रामदास मेदगे, चंद्रकांत मेदगे, मंगेश दरोडे, किसन गुळवे, वैभव गुळवे, किशोर पवार, हेमंत सोनवणे व सर्व मित्र परिवाराने या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.

Deshdoot
www.deshdoot.com