हैदराबाद पोलिसांच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचा मोर्चा; शहरात कडकडीत बंद
स्थानिक बातम्या

हैदराबाद पोलिसांच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचा मोर्चा; शहरात कडकडीत बंद

Gokul Pawar

नाशिक : शहरातील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांच्या मृत्यूनंतर सराफ व्यावसायिकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच शहरात सराफ व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.

दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यात हैद्राबाद पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयित सराफाचा येथील शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२५) रोजी घडली. यानंतर बिरारी यांच्या मृत्यूची माहिती समजताच संतप्त नातेवाईकांनी तसेच सराफ असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. रूग्णालयाबाहेर ठिय्या देत, या घटनेस हैद्राबाद पोलिस कारणीभूत असून, त्यांच्याविरोधात हत्या, अपहरण आदी गुन्हे दाखल करीत अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

यानंतर आज शहरातील सराफ व्यावसायिकांकडून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसेच हैदराबाद येथील पोलिसांच्या कृतीचा निषेधार्थ सराफ व्यावसायिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com