संत निवृत्तीनाथ महाराज पालखी ६ जूनला पंढरपूर कडे प्रस्थान करणार?
स्थानिक बातम्या

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी ६ जूनला पंढरपूर कडे प्रस्थान करणार?

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : आषाढ वारीच्या निमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पालखी येत्या सहा जूनला पंढरपूरला रवाना होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान सध्या लॉक डाऊन चा काळ असल्याने येत्या तीन मे ला याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पायी दिंडी जाणार की नाही याबाबत सांशकता निर्माण झाली आहे.

जुलैमध्ये पंढरपूर येथे आषाढ वारी होत असते. यासाठी राज्यातून अनेक पायी दिंड्या या ठिकाणी येत असतात. परंतु यंदा करोनाचे सावट असल्याने यंदाची आषाढ वारी होईल की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी यंदा सहा जूनला जाणार यासाठीचे वेळापत्रक या आधीच ट्रस्ट मंडळाने वारकरी भाविकांच्या सोयी साठी जाहीर केलेले आहे. शासन ज्या सूचना देईल त्या सूचनेनुसार पालखी
प्रस्थानचा निर्णय होईल.
– पवन भुतडा, मंदिर अध्यक्ष

Deshdoot
www.deshdoot.com