संत निरंकारी चॅरिटेबलकडून देशभरात स्वच्छता अभियान; नाशकात ५ टन कचरा जमा
स्थानिक बातम्या

संत निरंकारी चॅरिटेबलकडून देशभरात स्वच्छता अभियान; नाशकात ५ टन कचरा जमा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंती निमित्त रविवारी (दि.२३) सकाळी साडे सात ते १२ वाजेपर्यंत बोरगड येथील समागम ग्राउंड येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यात सुमारे पाच टन कचरा जमा करण्यात आला.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संपुर्ण देशभरातुन चारशे शहरातील १२६६ सरकारी रूग्णालयांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पण नुकताच संत समागम नाशिक मधील बोरगड येथे झाला. नंतर मोठया स्वरूपात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती. पण काही प्रमाणात कचरा दिसत असल्याने आज या भागात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ नाशिक उपमहापौर भिकुबाई बागुल, नाशिकचे संयोजक गुलाब पंजवाणी व सेवादल संचालक गुरूदास शेटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या भव्य दिव्य स्वच्छता मोहिमेत शहरातुन सुमारे हजारावर निरंकारी स्वयंसेवक, फाउंडेशनचे स्वयंसेवक तसेच अन्य निरंकारी भक्त यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी पांजरापोळ, ठक्कर, चांदवडकर व चामार लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या चारही मैदानाची साफ सफाई करण्यात आली. तसेच भाविकांनी संपुर्ण परिसरात सुमारे ४ ते ५ टन कचरा जमा केला. सुमारे तीन तासांमध्ये चारही मैदाने चकाचक दिसत होते. जमा झालेला संपुर्ण कचरा महापालिकेच्या स्वाधिन करण्यात आला. निरंकारी भाविकांचा स्वयंस्फुर्तीने स्वच्छता अभियानात सहभाग पाहुन परिसरातील रहिवाशीही या अभियानात सहभागी झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com