इंदिरानगर : कौतुकास्पद! कचऱ्यातील चार तोळ्याच्या बांगड्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केल्या परत
स्थानिक बातम्या

इंदिरानगर : कौतुकास्पद! कचऱ्यातील चार तोळ्याच्या बांगड्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केल्या परत

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : अनवधानाने कचऱ्यात टाकलेल्या तब्बल चार तोळ्यांच्या बांगड्या घंडागाडीच्या कर्मचाऱ्यांनी परत केल्याने त्यांच्यावर कौतकाचा वर्षाव होत आहे. महापालिकेचे घंटागाडी कर्मचारी उमेश दोंदे आणि ज्ञानेश्वर साळुंके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून माणुसकी टिकून असल्याचे यांनी दाखवून दिले आहे.

सध्याच्या आधुनिक युगात सर्वत्र स्वैराचार वाढत असताना नाशिकमधील या घटनेने माणुसकी जिवंत असल्याचे मूर्तिमंत उदाहरण दिले आहे. पाथर्डी फाटा येथल घटना असून दोन्ही घंटागाडी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.

येथील दामोदर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने नेहमीप्रमाणे घंटागाडीत कचऱ्याचा डब्बा दिला. पंरतु घंटागाडी निघून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि कचऱ्याच्या डब्यातील गुलाबजामच्या बॉक्समध्ये चार तोळे सोन्याचा बांगड्या ठेवल्या होत्या. त्या कचऱ्यासोबत बॉक्सही टाकला गेला. त्यांनी तात्काळ कचरा डेपो गाठला. यानंतर या घंटागाडीवर असलेल्या या दोन कर्मचाऱ्यांनी घंटागाडी खाली करत गुलाबजामचा बॉक्स शोधून काढला. आणि चार तोळ्याच्या बांगड्या परत केल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com