दिंडोरी : शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद

दिंडोरी : शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद

दिंडोरी : शहरात सकाळी सात वाजेपासूनच पंतप्रधान मोदी यांनी केलेलता आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला.कुठेही कोणीही बळ जबरी केली नसतांना जनतेने रस्त्यावर येणे टाळले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या विरोधातील लढाईत सर्व दिंडोरोकर सहभागी झाले आहे. सर्व पेट्रोलपम्प, बीअर बार, हॉटेल, शाळा, इतर दुकाने बंद असून गराजेपुरतेच कोणीही बाहेर पडताना दिसत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने आता बर्यापैकी ग्रामीण भागात जागृती झाल्याचे दिसत आहे.

प्रांत संदीप आहेर,तहसीलदार कैलास पवार ,पोलिस निरीक्षक अनिल बोरसे तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे. एकाच ठिकाणी गर्दी जमू नये यासाठी पोलीस वाहन नजर ठेवून आहे.शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.

सर्व नागरिकांनी कोरोना या आजाराला हद्दपार करण्यासाठी शासकीय आदेशाचे पालन करावे असे आवाहन नगरसेविका मालती दिलीप जाधव यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी मात्र थोडी अडचण होणार आहे. मेडिकल, रुग्णालये सुरु आहेत. दरम्यान ही परिस्थिती सकाळच्या सुमारास पाहावयास मिळाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com