जिवनाश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आरटीओ देणार स्टिकर
स्थानिक बातम्या

जिवनाश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आरटीओ देणार स्टिकर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । संचारबंदित कृषी संबंधित बियाणे, खते व जीवनाश्यक वस्तू वाहतुक याबाबत बंदी नसुन या सर्व सेवा सुरळीतपणे चालु राहतील. सर्व शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता व घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हयातील नागरिकांना केले आहे.

भुसे यांनी गुरुवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपुरक उद्योग यांना लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा केली.

घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नसुन नागरिकांनी शासनाला सहकार्य केल्यास कोरोना संकटाचा मुकाबला करु शकतो. शेती संबधित बियाणे व खते व्यवसाय, शेतीपुरक उद्योग निगडित उत्पादनाची वाहतुकीत अडचणी येणार नाहित याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. आरटीओने जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेसाठी वाहतुक करणाऱ्या वाहनांना ऑनलाईन परवाने व स्टीकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. कृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरु राहतील.

आवश्यकतेनुसार मालाचा पुरवठा करण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. यावेळि बैठकीला यावेळी खासदार डॉ.भारती पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार अनिल कदम, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मालेगांवातील प्रकार दुर्देवी असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. काही नागरिकांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार केला आहे. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसुल विभाग, आपत्तीच्या कामात सर्वच विभाग अत्यंत सचोटीने काम करत आहेत. या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत.
-कृषी मंत्री दादाजी भुसे

Deshdoot
www.deshdoot.com