गंगापूर येथील गोदापात्राची रोबोट मशीनने ‘साफसफाई
स्थानिक बातम्या

गंगापूर येथील गोदापात्राची रोबोट मशीनने ‘साफसफाई

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : गंगापुर येथील गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक महानगरपालिकेचे रोबोट मशीन, बांधकाम व आरोग्य विभागाचे कर्मचारी द्वारे पानवेली, गाळ, कचरा आदी काढून तसेच संपूर्ण गंगापुर गावात नाशिक मनपाच्या विविध विभागाद्वारे हि मोहीम राबविण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून रोबोट मशीनच्या साहाय्याने नदीपात्र , तथा शहर परिसराची साफसफाई करण्यात येते. हा रोबोट ३६० अँगलने फिरत असल्याने कठीण नाल्यामध्येही स्वच्छता करताना या मशीनचा चांगला उपयोग होत आहे. या मोहिमेत मनपाकडून बांधकाम, आरोग्य, उद्यान, ड्रेनेज आदी या सर्व डिपार्टमेंटद्वारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com