इगतपुरी : गर्दीचा फायदा घेऊन लूटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

इगतपुरी : गर्दीचा फायदा घेऊन लूटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

इगतपुरी । दि. १५ रोजी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे ग्रामस्थांतर्फे महाराष्ट्र केसरी विजेते पहीलवान हर्षवर्धन सदगीर यांचा जंगी सत्कार व चारचाकी गाडी भेट समारंभ आयोजित केला होता. सत्कार समारंभास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, दरम्यान नांदगाव सदो, ता. इगतपुरी येथील व्यापारी प्रशांत नारायण कडू यांचे पॅन्टचे खिशातील दोन लाख रुपयाची रक्कम काही अज्ञात आरोपींनी गर्दीचा फायदा घेऊन लांबवली होती. या बाबत इगतपुरी पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं. ०७/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्ह्याचे समांतर तपासात घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेजची पडताळणी करून मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे मालेगाव शहरातील दोन सराईत अब्दुल रेहमान उर्फ नाट्या मोहमद फारुख, वय २५, रा. गली नं.१, नवा आझादनगर, मालेगाव व हमीदअली उर्फ दलीया मोहमद उमर, वय ४०, रा. रोशनाबाद, तडवीनगर, मालेगाव या दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतले असुन बिलाल गुलाब खान, रा. मालेगाव हा फरार आहे.

ताब्यात घेतलेलेल्या आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचे कब्जातून चोरीस गेलेले रोख १.५ लाख ( दिड लाख ) रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार क्र. एम. एच. ०५, बी. एस. १०२७ असा एकुण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील आरोपी हे मालेगाव शहरातील सराईत गुन्हेगार असून त्यांचेकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपींचा साथीदार बिलाल खान याचा स्थागुशाचे पथक कसोशीने शोध घेत आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सपोनि अनिल वाघ, सपोउनि नवनाथ गुरुळे, पोहवा रविंद्र वानखेडे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, पोलीस हवालदार संदिप हांडगे, सचिन पिंगळ, गिरीष बागुल, प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com