इगतपुरीच्या हातसडीच्या तांदळाचा मुंबईत डंका
स्थानिक बातम्या

इगतपुरीच्या हातसडीच्या तांदळाचा मुंबईत डंका

Gokul Pawar

घोटी : दिवसेंदिवस खतांचा मोठ्या प्रमाणात वापर व अत्याधुनिक मशिनरी त्यामुळे धानाची तथा तांदळाची जीवनसत्वे कमी कमी होत आहे म्हणून आरोग्यासाठी होणारी हानी हे लक्षात घेता घोटी (ता इगतपुरी) येथील अन्नपूर्णा स्वयंसहायता महिला बचत गटाने हातसडीचा तांदूळ, जात्यावरच्या डाळीवर भर देत बचत गटाच्या माध्यमातून निर्णय घेतला व विक्रीसाठी उपलब्ध केला विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली अभियान अंतर्गत मुबंई येथे महालक्ष्मी सारस हे प्रदर्शन चालू आहे यामध्ये राज्यभरातील बचत गटांचा सहभाग असतो मात्र जे बचत गट सामाजिक काम करत असतात त्यांनाच संधी दिली जाती व इगतपुरी तालुक्यातील या एकाच अन्नपूर्णा स्वयंसहाय्यता बचत गटाची या प्रदर्शनसाठी निवड झाली असल्याची माहिती गटाच्या अध्यक्षा मथुरा जाधव यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली अंतर्गत प्रत्येक वर्षी भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते त्या अंतर्गत राज्यभरातील निवडक बचत गटांचीच निवड करण्यात येते विशेष म्हणजे विश्वासू बचत गटांनाच या ठिकाणी संधी दिली जाते.दरम्यान घोटी येथील अन्नपूर्णा स्वयंसहायता महिला बचत गटाचे सामाजिक कार्य व उत्पादनाची विश्वसहरता लक्षात घेता या राज्यस्तरीय प्रदर्शनात या गटाची निवड करण्यात आली.

मथुरा जाधव यांनी गेल्या तेरा वर्षात यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन बचत गट निर्मितीसाठी विशेष मार्गदर्शन करत अनेक बचत गटांची निर्मिती केली आहे त्यांनी बचत गटाचे फायदे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान बचत गटाला जिल्हा समनव्यक संतोष डोंबे, सुशील चौधरी, संदीप सोनवणे यांचे देखील सहकार्य लाभल्याची माहिती अध्यक्षा मथुरा जाधव यांनी दिली.

गेल्या तेरा वर्षात मी इगतपुरी तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे सामाजिक उपक्रमसहा आम्ही शुद्ध गुळाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात करत असतो विशेष म्हणजे हातसडीचा तांदूळ देखील मोठया प्रमाणात आम्ही बचत गटाच्या माध्यमातून विक्री करत असतो व त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद देखील मिळत असतो व त्यामाध्यमातून महिलांना रोजगार मिळतो.
-मथुरा जाधव (अध्यक्षा – अन्नपूर्णा महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गट, घोटी )

Deshdoot
www.deshdoot.com