जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर

नाशिक । जिल्ह्यातील पंधरा पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण सोडत शनिवारी (दि.21)जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्याने एच्छुकांचा हिरमोड झाला तर काहींना आनंद झाला. आठवडाभरात पंचायत समिती सभापती निवडणूक कार्यक्रम घोषित होईल,अशी शक्यता आहे.

येवला व बागलाण पंचायत समिती सभापतीपद हे अनुसूचित जमाती(एस टी)महिलेसाठी आरक्षित झाले आहे. मात्र,या प्रवर्गातून एकही महिला सदस्य निवडूण आलेली नाही. त्यामुळे सभापती निवडीनंतर या ठिकाणचे आरक्षण पुन्हा नव्याने काढण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक झाली. 14 मार्च 2017 रोजी पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड झाली होती, तर 21 मार्च 2017 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. सभापती व पदाधिकार्‍यांची असलेली अडीच वषार्र्ंची मुदत 14 व 21 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आली. परंतु शासनाने जिल्हा परिषद पदाधिकारी व पंचायत समिती सभापतींना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार 20 ऑगस्ट रोजी हा आदेश ग्रामविकास विभागाने काढला होता.चार महिन्यांची दिलेली मुदत 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन 20 डिसेंबरनंतर कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या होत्या.या आदेशानुसार शनिवारी (दि.21) जिल्हा प्रशासनाकडून पंचायत समितींच्या सभापतींचे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आली.

सर्वसाधारणसाठी आरक्षण नाही

या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण व अनुसूचीत जाती महिला या दोन प्रवर्गासाठी मात्र जागाच नसल्यामुळे आरक्षण काधण्यात आले नाही.अनुसूचीत क्षेत्रातील अनुसूचीत जमातीसाठी(3),अनुसूचीत जमाती(महिला)4 याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले.तसेच अनुसूचीत क्षेत्र वगळून उर्वरित पंचायत समित्यांकरिता अनुसूचीत जाती(1),अनुसूचीत जाती महिला(0),अनुसूचीत जमाती(1).अनुसूचीत जमाती महिला (1)नागरिकांचा मागास प्रवर्ग(2),नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (2)सर्वसाधारण (0),सर्वसाधारण महिला (1)याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले.

असे आहे आरक्षण

सर्वसाधारण (महिला )-निफाड,
नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी)- मालेगाव,नांदगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)(महिला)- सिन्नर, नाशिक
अनुसूचित जमाती(एस टी)(महिला)- दिंडोरी ,कळवण, बागलाण ,सुरगाणा ,येवला .
अनुसूचित जमाती(एस टी)- इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,पेठ ,देवळा.
अनुसूचित जाती(एस.सी)-चांदवड

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com