इगतपुरी शहरात करोनाचा शिरकाव ; एक रूग्ण पॉजिटीव्ह तर चार जण क्वारंटाईन
स्थानिक बातम्या

इगतपुरी शहरात करोनाचा शिरकाव ; एक रूग्ण पॉजिटीव्ह तर चार जण क्वारंटाईन

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी : गेल्या तब्बल ६५ दिवस करोनाससंर्ग मुक्त असलेल्या इगतपुरी शहरात शनिवार (दि. ३०) रोजी एका ७७ वर्षिय इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने प्रशासन यंत्रणा खडबडुन जागी झाली. शहरातील बस स्थानक ते पोलीस ठाणे कार्यालयापर्यंतचा मुख्य रहदारीचा रस्ता सिल करण्यात आला असुन (दि. ०४) जुन पर्यंत जनता कर्फ्यू लागु करण्यात आला आहे.

शहरातील टीकापुरी खालची पेठ येथील वयोवृद्ध ७७ वर्षीय इसम यांना पोटाचा त्रास होत असल्याने (दि.२६) मे रोजी त्यांना नाशिक येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने विविध प्रकारच्या तपासण्यासह कोरोनाचीही तपासणी करण्यात आली असता (दि.३०) मे रोजी त्यांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याचे समजताच त्यांना पुढील उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

याबाबत माहीती समजताचं तहसिलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, ग्रामिण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी स्वरुपा देवरे व नगरपरिषदेचे आरोग्य पथक यांनी तातडीने टिकापुरी खालची पेठ भागाची पहाणी करुन पन्नास मिटर पर्यंतचा चारही बाजुने भाग सिलबंद केला.

करोना बाधीत रूग्णाच्या कुटुंबातील चार व्यक्तीना त्वरीत भावली येथील इंग्लिश मेडीयम निवासी शाळेत कोरोंटाईन करण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असुन व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने गुरुवार (दि.४) जुन पर्यंत मेडीकल, दवाखाना, दुध आदी आत्यावश्यक सेवा वगळता जनता कर्फ्यू घोषीत केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com