नाशिकमध्ये ३८.४ अंश तापमानाची नोंद; दिवसा चटका तर रात्री उकाडा

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रभाव आणि त्यातच जीवाची लाही लाही करणारे ऊन यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दिवसा उन्हाचा चटका लागत असताना तरीही उकाडा जाणवत असल्याने दिसून येत आहे.

दरम्यान सध्या कोरोनाचा भयंकर कहर चालू असताना गेल्या आठवड्यापासून तापमानातही वाढ होत आहे. यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऊन खाली उतरत नाही. जिल्ह्यातील अनेक भागात मागील आठवड्यात पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक हतबल झाले होते. त्यातच आता उन्हाचा चटका जाणवत आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागातही उन्हाचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्याचे कालचे तापमान ३८ सेल्सियस च्या आसपास होते. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच जोरदार उकाडा जाणवत आहे. तसेच रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे. दोन दिवसांनंतर सर्वच ठिकाणी निरभ्र आकाश राहील. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होऊ शकते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *