Friday, April 26, 2024
Homeनाशिककाळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साध्या पद्धतीने होणार

काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साध्या पद्धतीने होणार

नाशिक : कोरोनाचे सावट आणि कलम १४४ नुसार जाहीर करण्यात आलेली संचारबंदी यामुळे नाशिकच्या संस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा राम जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृपया भाविकांनी काळाराम मंदिर येथे गर्दी करू नये असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष न्या. विकास कुलकर्णी यांनी केले आहे.

गुरुवार दोन एप्रिल रोजी रामनवमी आहे. मात्र संचार बंदीमुळे यंदाचा राम जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरात केवळ चार पुजाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिराचे सगळे दरवाजे देखील बंद राहणार आहेत. केवळ पुजाऱ्यांसाठी एक दरवाजा खुला असणार आहे. तसेच मंदिरात केवळ चार पुजारीच राम जन्मोत्सवाचा सोहळा पार पाडतील.

- Advertisement -

पुजाऱ्याशिवाय इतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाचे सावट असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, कृपया सर्व भाविकांनी सहकार्य करावे आणि गर्दी करू नये असे आवाहन काळाराम मंदिराचे अध्यक्ष न्या. विकास कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या