file photo
file photo
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये दोन हुक्का पार्लरवर छापा; मद्यसाठा, पॉट जप्त

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : शहरातील दोन ठिकाणी सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर नाशिक पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत मद्यसाठा व हुक्का पिण्याचे पॉट जप्त करण्यात आले आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पथक गठीत करण्यात आले आहे. पथकाने हसरुळ पोलीस ठाणे हद्दीतील मखमलाबाद लिंक रोडवरील हॉटेल बार ओ बार व हुक्का पार्लर आणि साईनगर चौफुलीजवळील वुई सर्व्ह हर्बल दिशा ओन्ली या हुक्का पार्लरवर छापा टाकला. पोलिसांनी एकास अटक केली असून सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. छाप्यात मद्यसाठा व हुक्का पिण्याचे दोन पॉट व सुगंधित तंबाखुजन्य हुक्का फेल्वर्स जप्त केले आहेत.

दरम्यान मखमलाबाद लिंकरोडवरील हॉटेल बार ओ बार या हॉटेलवर शहर पोलिसांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने छापा टाकून सुमारे 50 हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. हॉटेलची तपासणी सुरू असताना हॉटेलच्या तळघरात हुक्का पार्लर सुरू असल्याचे उघडकीस आले असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत, साईनगर चौफुलीजवळील वुई सर्व्ह हर्बल दिशा ओन्ली या हुक्का पार्लरवर गुरुवारी (दि.२७) पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी हुक्का पार्लरमालक अफताब इस्माईल सैय्यद (२१, रा.नागजी रोड, नाशिक) यास ताब्यात घेतले असून पार्लरमधून हुक्का जप्त करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com