राज्यातील ६१ उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती
स्थानिक बातम्या

राज्यातील ६१ उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती

Gokul Pawar

नाशिक : राज्यातील ६१ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यसह महेश पाटील, उन्मेश महाजन, धनंजय निकम, जितेंद्र काकूंस्ते , डॉ. नितीन महाजन, प्रवीण महाजन यांचा समावेश आहे.

दरम्यान पदोन्नतीवरून मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देत पदोन्नती बाबत राज्य शासनास अधिकार दिल्याने, शासनाने लागलीच ६१ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्याची अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती केली आहे.

शासनाने विभागनिहाय नियुक्त्या केल्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित अधिकारी यांना त्या पदाचे लाभ दिले जाणार आहेत. अखेर अनेक दिवसांपासून रखडलेली प्रक्रिया शासनाने अखेर मार्गी लावल्याने राज्यातील ६१ अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com