लॉकडाउनमध्ये ऑनलाइन माध्यमांचा वापर करीत प्राध्यापकांचे वर्क फ्रॉम होम

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात केंद्र सरकारने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले असून प्राध्यापकांना नेहमीप्रमाणे वर्गात जाऊन शिकविणे शक्य नाही. या दरम्यान विद्यार्थी व शिक्षक सर्वांनीच आपापल्या घरीच थांबावे असे आदेशित करण्यात आलेले आहे.

कोरोनाव्हायरस या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने  वरील पर्याय अवलंबिला असून या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम या धोरणाखाली विद्यार्थ्यांसोबत विविध माध्यमांचा वापर करून संपर्क साधावा व मार्गदर्शन करावे अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कडून सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित, न.ब. ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक मध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्राध्यापकांनी  Gmail, Classwise WhatsApp Group, Subject Wise WhatsApp Group द्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पावर पॉइंट प्रेझेंटेशन, ऑडिओ लेक्चर्स, अभ्यासाचे साहित्य, निबंध लेखन , नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया विषयी माहिती तसेच विविध विषयांच्या असाइनमेंट देऊन  विद्यार्थ्यांशी संपर्क साधला.

तसेच सर्व असाइनमेंट्स ऑनलाइन  पद्धतीने स्विकारण्यासाठी गुगल फॉर्म यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे त्याला संपूर्ण विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत महाविद्यालयाला जवळपास १३०० गुगल फॉर्म प्राप्त झालेले आहेत.

तसेच महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर  लॉकडाऊन दरम्यान आणि नंतरच्या  काळात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या संतुलनासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशांच्या  अनुषंगाने महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर Covid-19  Online Help Center सुरू करुन विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या तसेच शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या यूट्यूब चैनल मार्फत उपलब्ध करून दिलेले विविध व्हिडिओ, तसेच इतर उपलब्ध सूचनांवषयी माहिती देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असेल.

यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ.  मो. स. गोसावी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य, उपप्राचार्य डॉ. संजय मांडवकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी मोलाचं सहकार्य केले.

प्राचार्या डॉ. सौ.अस्मिता वैद्य यांनी  विद्यार्थ्यांना हेल्प सेंटर अंतर्गत संपर्क साधण्यासाठी [email protected] हा ई-मेल उपलब्ध करून दिला आहे. तसेच समुपदेशक म्हणून प्रा. संदीप सातभाई आणि प्रा. उल्का चौहान यांची नेमणूक करून त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *